किसान सफलता कार्ड (मराठी)

भारतातील कृषी वित्त ही कृषी व्यवसायाची गरज आहे. कृषी वित्त हे केवळ शेती उत्पादन आणि पिकांच्या व्यापारासाठीच नव्हे तर कृषी अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी देखील तितकेच महत्त्वाचे आहे. बहुतेक भारतीय शेतकऱ्यांना खराब हवामान, खराब पीक किंवा नैसर्गिक आपत्ती यांसारख्या मोठ्या सकटांना तोंड द्यावे लागते, त्यामुळे कर्जासाठी त्यांना सावकाराकडे जावे लागते.

पारंपारिक कृषी व्यवस्थापन, पीक पद्धती, प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती, पीकांचा उत्पादन खर्च न निघणे या अशा अनेक कारणांमुळे शेतकरी कर्जबाजारी होतो आणि मग त्यातून बाहेर पडणे त्याच्यासाठी अधिकच कठीण अन् गुंतागुंतीचे होते. किंबहुना, वर्षानुवर्षे चालत आलेले हे कर्ज शेतकर्‍यांच्या जबाबदारीचा, कर्तव्याचा मोठा भाग आहे आणि त्यामुळे ते त्यांच्या जमिनी आणि संपत्तीसह पुढील पिढीला ही कर्जदार बनतात.

भारतातील शेतक-यांच्या कर्जबाजारीपणाची चार प्रमुख कारणे:

(i) शेतक-याचे अस्थिर उत्पन्न

(ii) मिळालेल्या कर्जाचा शेतीविषयक कामांसाठी वापर न करता येणे

(iii) खाजगी सावकाराकडून घेतले जाणारे कर्ज

(iv) आर्थिक व्यवस्थापनाचा अभाव

‘आर्थिक मदत ही काळाची गरज आहे.’

शेतकर्‍यांना अल्पावधीत औपचारिक आर्थिक सेवा प्रदान करण्यासाठी ऑगस्ट 1998 मध्ये ही कृषी वित्त योजना सुरू करण्यात आली. ही योजना भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी सुरू केली होती आणि ती नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर आणि नाबार्डद्वारे (नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट) तयार केली गेली होती. त्यात समाविष्ट असलेल्या तरतुदी या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देऊन कृषी क्षेत्रातील व्यापक भांडवलींच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने होत्या.

agri credit

आपल्या शेतकर्‍यांना कृषी वित्त सहज उपलब्ध व्हावे या उद्देशाने अॅग्रीबाजार खास शेतकर्‍यांसाठी किसान सफलता कार्ड घेऊन आला आहे. हे कार्ड शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामांसाठी, कृषी साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच कृषी उत्पादनासाठी रोख रक्कम काढता यावी यासाठी जारी केले जाईल. किसान सफलता कार्ड हे शेतकऱ्यांना त्यांच्या कापणीपूर्व आणि नंतरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करते.

शेतकरी गरज पडेल तेव्हा या कार्डद्वारे त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकतात. किसान सफलता कार्डचे आणखी काही प्रमुख फायदे आहेत. हे कार्ड 12 महिन्यांच्या कर्ज परतफेडीच्या सुलभ सुविधेसह कर्जाच्या परतफेडीचा पर्याय देते. कार्डची रक्कम ₹10,000 ते ₹50,000 पर्यंत आहे. हे कार्ड तुम्हांला वापरानुसार आकर्षक कॅश-बॅक ऑफर करते, इतकेच नाही तर इतर अनेक फायदे देखील देते.

एग्रीबाजारचे सह-संस्थापक आणि संचालक अमित मुंडावाला म्हणाले – “आम्हाला जाणवले की आजच्या डिजिटल जगात शेतकरी महत्त्वाचा घटक असल्याने त्यांच्यासाठी कार्ड लॉन्च करण्याची गरज आहे. जर शेतकरी अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करत असतील तर त्यांना डिजिटल जगापासून दूर का ठेवावे? त्यामुळे किसान सफलता कार्ड हे विशेषत: भारतीय शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आले आहे.

More Articles for You

कार्बन फार्मिंग: पर्यावरण संतुलन के साथ बढ़ाएं अपनी फसल और आय!

आज की खेती केवल अन्न उगाने तक सीमित नहीं रह गई है। बदलते मौसम, घटती मिट्टी की उर्वरता और जलवायु …

Role of digital platforms in reducing food wastage and logistics costs!

In 2024, approximately 78 million tonnes of food were wasted annually in India, translating to about 55 kg per capita. …

WhatsApp Connect With Us